अॅमेझॉन कंपनी 2025 पर्यंत जवळपास 14 हजार कर्मचाऱ्यांना विशेष करून मॅनेजर्संना कामावरून काढणार आहे. दरवर्षी 3 अब्ज डॉलर्सची बचत करण्यासाठी कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉनच्या एकूण वर्कफोर्समध्ये मॅनेजर्सच्या भूमिकांचा वाटा जवळपास 7 टक्के आहे. 2024 च्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस कंपनीकडे जागतिक स्तरांवर जवळपास 1 लाख 5 हजार 770 व्यवस्थापक होते, परंतु 2025 पर्यंतच्या पहिल्या तिमाहीपर्यंत कंपनीकडे केवळ 91 हजार 936 मॅनेजर्स असतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.