अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोसने अॅमेझॉनचे 5 बिलियन डॉलरचे शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला आहे. अमेझॉनचे शेअर सध्या 200.43 डॉलरच्या उंच स्तरावर पोहोचला आहे. या शेअर्सच्या विक्रीनंतर जेफ बेजोस यांच्याकडे 912 मिलियन अॅमेझॉनचे शेअर्स उरतील. म्हणजेच स्टॉकचा 8.8 टक्के हिस्सा त्यांच्याकडे असेल. या वर्षी फेब्रुवारीमध्ये जेफ बेजोसने 80 टक्के शेअर्सच्या वाढीनंतर 8.5 बिलियन डॉलरचे शेअर्स विकले होते.