
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांची पूर्वीची पत्नी मॅकेंजी स्कॉट यांनी घटस्फोट घेतल्यापासून आतापर्यंत जवळपास 1 लाख 64 हजार 550 कोटी रुपयांचे दान वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना केले आहे. घटस्फोट झाल्यानंतर मॅकेंजी स्कॉट यांना अॅमेझॉनमध्ये 4 टक्के भागीदारी मिळाली होती. मॅकेंजी या नेहमी दान करत असतात. 2019 पासून त्यांनी आतापर्यंत आपल्या 35.6 बिलियन अमेरिकन डॉलर्सच्या संपत्तीपैकी 19 बिलियन अमेरिक डॉलर्स दान म्हणून दिले. गेल्या सहा वर्षांत त्यांनी दोन हजारांहून अधिक नॉन प्रॉफिट संघटनांना आर्थिक मदत दिली आहे. घटस्फोट झाला त्या वेळी जेफ बेजोस यांच्याकडून मॅकेंजी यांना अमेझॉनची 4 टक्के भागीदारी मिळाली होती. त्या वेळी याची किंमत 36 बिलियन डॉलर होती.
2450 हून अधिक एनजीओंना मदत
फोर्ब्सच्या माहितीनुसार, मॅकेंजी यांची संपत्ती 32 बिलियन अमेरिकन डॉलर आहे. मॅकेंजी या टेक्सासपासून उत्तरी तंजानियापर्यंत 2450 हून अधिक एनजीओंना आर्थिक मदत करत आहेत.