अ‍ॅमेझॉनचे सॅटेलाइट लाँच

ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉन आता इंटरनेट सॅटेलाईट सेक्टरमध्ये उतरली आहे. कंपनीने आपले पहिले इंटरनेट सॅटेलाईट लाँच केले आहे. एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीनंतर अ‍ॅमेझॉनने यात एण्ट्री मारली आहे. सध्या या क्षेत्रात स्टार लिंकचा दबदबा आहे. युनायटेड लाँच अलायन्सच्या व्ही रॉकेटवरून अ‍ॅमेझॉनच्या प्रोजेक्ट कुइपरच्या 27 सॅटेलाइटवरून हे उड्डाण करण्यात आले असून याला कक्षेत (ऑर्बिट) सोडण्यात आले. उड्डाणानंतर हे सॅटेलाइट जवळपास 630 किलोमीटर उंचीवर पोहोचणार आहे. याआधी ऍमेझॉनने 2023 मध्ये चाचणीसाठी दोन सॅटेलाइट लाँच केले होते. नव्या सॅटेलाइटला मिरर फिल्मने कव्हर करण्यात आले. कारण यामुळे अंतराळ प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, तर दुसरीकडे अनेक वैज्ञानिकांनी तारामंडलमधील इंटरनेट सॅटेलाइटच्या स्पर्धेमुळे चिंता व्यक्त केली आहे.