अनोख्या ठिकाणांना भेट द्यायची असेल तर जगात एक जागा अशी आहे, जिथे 10 लाख पक्षी आणि फक्त 20 माणसं राहतात. तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुमच्यासाठी हा स्वर्गच आहे. हे ठिकाण म्हणजे युरोपच्या आईसलँड देशाच्या उत्तरेकडे 40 किमी दूर असलेले ग्रिमसे बेट. या बेटावर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे म्हणजे वीस लोक राहतात. मात्र बेटावर समुद्री पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. ग्रिमसे बेट हे समुद्री पक्ष्यांचे घर आहे. अकुरेरी शहरातून 20 मिनिटांचे विमान आणि डाल्विक गावातून तीन तासांचा फेरीबोटीने प्रवास करून या अद्भुत बेटावर पोचता येते.