अमरनाथ यात्रेसाठी नोंदणीला अखेर सुरुवात

अमरनाथ यात्रासाठी अखेर मंगळवारपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही नोंदणी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारांमध्ये करता येते. ऑनलाईन नोंदणीसाठीचे शुल्क 220 रुपये ठेवण्यात आले. वार्षिक यात्रेचे व्यवस्थापन करणाऱया श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने यात्रेकरूंच्या आगाऊ नोंदणीसाठी देशभरातील एकूण 540 बँक शाखा नियुक्त केल्या आहेत. नियुक्त बँक शाखांबाहेर भाविकांच्या रांगा लागल्या. अमरनाथ यात्रा येत्या 3 जुलैपासून सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी दोन मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. पहिला मार्ग पहलगाम मार्ग, तर दुसरा मार्ग बालटाल मार्ग आहे. गेल्या दोन वर्षांपासून भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाविक जास्त प्रमाणात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.