अमरनाथ यात्रेने मोडला 12 वर्षांचा रेकॉर्ड

अमरनाथ यात्रेत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी भाविकांची संख्या 5 लाखांवर पोहोचली असून अमरनाथ यात्रेने 12 वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे. तीर्थयात्रेच्या इतिहासात तिसऱ्यांदा एवढय़ा मोठय़ा संख्येने भाविक दर्शनासाठी आले आहेत. याआधी 2011 मध्ये 6.36 लाख भाविक दर्शनासाठी पोहोचले होते. 2012 मध्ये 6.20 लाख शिवभक्तांनी बाबा बर्फानीचे दर्शन घेतले होते. या वर्षी आतापर्यंत 5 लाख 105 भाविकांनी दर्शन घेतले आहे. अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू झाली असून 19 ऑगस्टला संपणार आहे.