अमरनाथ यात्रा 3 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार; नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

अमरनाथ येथील प्रसिद्ध गुहेतील बर्फातील भोलेनाथांचे दर्शन.

अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार आहे. तसेच 9 ऑगस्टपर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात अमरनाथ यात्रेला सुरुवात होते. अमरनाथ यात्रेला आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. यंदा सुमारे 62 दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी 14 एप्रिलपासून ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे.

या वर्षी अमरनाथ यात्रा 3 जुलै 2025 ते 9 ऑगस्ट 2025 पर्यंत चालणार आहे. यात्रेसाठी नोंदणी 14 एप्रिल 2025 पासून सुरू झाली आहे. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑफलाइन आणि ऑनलाइन नोंदणी करू शकतात. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या देशभरात 540 हून अधिक शाखा आहेत जिथून तुम्ही नोंदणी करू शकता.

बाबा बर्फानी यांना अमरनाथ आणि अमरेश्वर असेही म्हणतात. अमरनाथचे दर्शन घेणाऱ्या भक्तांना शिवलोकात स्थान मिळते, अशी मान्यता आहे. दरवर्षी, देश-विदेशातून लाखो भाविक या यात्रेत सहभागी होतात. अमरनाथ यात्रा खडतर असून ती पवित्र यात्रा मानली जाते. अमरनाथ गुहेत एक नैसर्गिक शिवलिंग आहे, जे बर्फापासून बनलेले आहे आणि चंद्राच्या टप्प्यांनुसार ते वाढत आणि कमी होत राहते. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान शिव यांनी या गुहेत देवी पार्वतीला अमरत्वाची कहाणी सांगितली, ज्यामुळे ही गुहा आणखी पवित्र झाली आणि या स्थानाला अमरनाथ असे नाव पडले. अमरनाथ यात्रा केल्याने भक्तांचे पाप नष्ट होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो, अशी श्रद्धा आहे.