उरणच्या प्रतीक अपार्टमेंटमध्ये राहणारी यशश्री शिंदे (22) हिची प्रेमप्रकरणातून डोक्यात दगड घालून निघृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. यशश्रीच्या आधी देखील नवी मुंबईतील कोपरखैरणे, नेरुळ भागातील दोन महिलांच्या देखील हत्या झाल्या आहेत. या प्रकरणात लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवावा, अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे नेते, विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. दानवे यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेत याबाबत निवेदन दिले आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे, नेरुळ व उरण भागात महिला व तरुणीवर झालेल्या धक्कादायक घटनांमुळे समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवून कुटुंबियांना न्याय द्यावा, असे निवेदन… pic.twitter.com/tSHRevSBhy
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 29, 2024
अंबादास दानवे यांनी सोमवारी उरणमधील पीडित तरुणी यशश्री शिंदे हिच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या राजुल पटेल, उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या शीतल देवरूखकर – शेठ, रेखा ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला सरचिटणीस रेखा ठाकरे उपस्थित होत्या.
”नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणाऱ्या एका महिलेवर मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी सामूहिक बलात्कार करत तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. तसेच नेरुळ मधील तेरणा रुग्णालयाकडून सातत्यानं बिल भरण्यासाठी तगादा लावल्याने गाढे यांनी आत्महत्या केली आहे. त्यानंतर आता नवी मुंबईच्या शेजारी असलेल्या उरणमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. 22 वर्षीय कुमारी यशश्री शिंदे नावाची तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. उरण शहरातील एनआय शाळेजवळ राहणाऱ्या यशश्रीचा मृतदेह आढळून आला आहे. सदरहू तरुणीचा चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आलेल्या आहेत. या घटनांमुळे रहिवाशांमध्ये चिंता वाढली आहे आणि समुदायातील सुरक्षितता आणि सुरक्षिततेच्या भावनेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे उच्च-जोखीम असलेल्या भागात पोलिसांची गस्त वाढवणे, सामुदायिक सहभागाचे कार्यक्रम वाढवणे आणि गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी कायद्यांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तथापि, पोलिसांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. शासन राज्यात महिलांच्या सबळीकरणासाठी लाडकी बहीणी सारख्या योजना राबवित आहेत. परंतु प्रत्यक्षात महिलांवरील अत्याचार व हत्येच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली आहे. सदरहू बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे”, असे निवेदन अंबादास दानवे यांनी दिले आहे