
विलेपार्ले पूर्व येथील साठय़े महाविद्यालय आणि साठय़े महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता ‘माजी विद्यार्थी कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्निव्हलमध्ये महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी खाद्य पदार्थ, पुस्तक विक्री, खेळ तसेच विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल लावणार आहेत. तसेच गायन, नृत्य, वादन, काव्यवाचन यासारखे सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करणार आहेत, अशी माहिती कार्निव्हलचे प्रमुख डॉ. समीर जाधव यांनी दिली. तसेच महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी कार्निव्हलमध्ये येऊन आपले महाविद्यालयीन जीवन आणि कॉलेजची मजामस्ती पुन्हा अनुभवावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव राजवाडे यांनी केले आहे.
संपर्क – 9820478759, 8850011548.