चेहरा चमकदार दिसण्यासाठी कोरफडचा करा वापर, जाणून घ्या बरेच फायदे

कोरफड हे औषधी गुणधर्माबरोबरच सौंदर्यवर्धकही आहे. त्वचेच्या सौंदर्यासाठी गुणकारी मानले जाते त्वचेला मॉइश्चरायझेशन आणि मुरुमांशी लढण्यासाठी कोरफड उत्तम आहे. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफडीची मदत होते. जाणून घेऊया कोरफडीचे आश्चर्यकारक फायदे.

कोरफडीचा मॉइश्चरायझर म्हणून वापर करणे ही अनेकांची सवय असते. दररोज कोरफड जेल लावून चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचा हायड्रेट राहून तजेलदार दिसते.  हायल्युरोनिक अॅसिडने समृद्ध असलेल्या कोरफड जेल त्वचेमध्ये कोलेजन वाढविण्यासाठी मदत करते..2024 मध्ये जर्नल ऑफ होलिस्टिक इंटिग्रेटिव्ह फार्मसीमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासात कोलेजन उत्पादन वाढल्याने त्वचा कोमल, सुरकुत्यारहित होते. त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.

त्वचेवर खूप ओपन पोअर्स असतील तर त्यासाठी 100 मिली गुलाब पाण्यात 2 टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल मिक्स करा. त्यात थोडे लव्हेंडर इसेंशियल ऑईल घ्या. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून दिवसातून एक-दोनदा हा स्प्रे चेहर्‍यावर मारा. काही दिवसांतच ओपन पोअर्स कमी होण्यास मदत मिळेल.

कोरफड जेलमध्ये थोडेसे गुलाबपाणी मिसळून चेहरा आणि मानेवर लावल्याने कोरडी त्वचा दूर होण्यास मदत होते. हे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा असे केल्यास त्याचा फायदा होतो.

दोन चमचे कोरफड जेलमध्ये थोडी हळद आणि एक चमचा दही मिसळून पॅक बनवा. त्यानंतर हा पॅक चेहरा आणि मानेला लावून 15 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावा. हा पॅक पिगमेंटेशन रोखण्यासाठी आणि त्वचा चमकदार करण्यासाठी मदत होते.