बीड जिह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शनिवार 4 जानेवारी रोजी परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयापासून हा मोर्चा निघणार असून महाराणा प्रताप चौक, शनी मंदिर, नानल पेठ मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येणार आहे. येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील, खासदार संजय जाधव, खासदार बजरंग सोनवणे, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, नरेंद्र पाटील, ज्योती मेटे आदींची उपस्थिती राहणार आहे.