27 वर्षांनंतर अलका कुबल रंगभूमीवर

अभिनेत्री अलका कुबल 27 वर्षांनंतर रंगभूमीवर दिसणार आहेत. त्यांचे ‘वजनदार’ मराठी नाटक लवकरच येत आहे. एका मोठ्या कालावधीनंतर रंगभूमीवर परतणाऱ्या अलका कुबल नाटकाविषयी फारच उत्सुक आहेत. आपल्या कमबॅकविषयी त्या म्हणाल्या, ‘‘27 वर्षांपूर्वी मी केलेल्या सुधीर भटांच्या ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकानंतर पुन्हा रंगभूमीवर मला काम करायचंच होतं. ‘वजनदार’ नाटकाच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. ’’