अली फजल व रिचा चढ्ढा झाले आई बाबा, कन्यारत्नाचा झाला लाभ

अभिनेता अली फजल व अभिनेत्री रिचा चढ्ढा यांच्या घरी पाळणा हलला असून रिचाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 16 जुलैला रिचाची डिलिव्हरी झाली आहे. अली व रिचाने एका निवदेन देत याबाबत माहिती दिली

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

“16 जुलै 2024 रोजी आमच्या घरी चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे. आमचं कुटुंब प्रचंड आनंदी आहे. आम्ही आमच्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कायम आभारी आहोत” असे या दोघांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

रिचा चढ्ढा आणि अली फजल हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहे. लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघेही त्यांच्या लव्हस्टोरी आणि अप्रतिम केमिस्ट्रीमुळे सतत चर्चेत असतात. 4 ऑक्टोबर, 2022 ला हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या दोन वर्षानंतर हे दोघे आता आई-वडील झाले आहेत.

al