
मध्य प्रदेशात 1 एप्रिलपासून 17 धार्मिक ठिकाणी दारूबंदीचा नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे उज्जैनच्या सीमेत दारूची विक्री करता येणार नाही. काळभैरव हे मंदिर उज्जैनच्या सीमेतच असल्याने मंदिराच्या आवारात असलेली दारूची दुकानेही बंद करण्यात आली आहेत. असे असले तरीही सरकारने बाहेरून दारू आणून काळभैरवला भोग चढवण्यास मान्यता दिली आहे. मात्र ही दारू आणण्याचे प्रमाण मर्यादित करण्यात आले आहे. दारूबंदीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. उज्जैनमध्ये येणाऱ्या सर्व मार्गांवर पोलिसांनी कडक पहारा ठेवला असून प्रत्येकाची तपासणी केल्याशिवाय सोडले जात नाही, अशी स्थिती आहे. पोलीस प्रामुख्याने इंदूर-उज्जैन, देवास-उज्जैन, बडनगर-उज्जैन, माकसी-उज्जैन आणि आगर-उज्जैन या मार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.