जगभरात सर्वात मोठय़ा आणि महागडय़ा विमानतळाची निर्मिती दुबईत होत आहे. या विमानतळाचा आकार तर अगदी मुंबई शहराएवढा आहे. विमानतळावर तब्बल 400 टर्मिनल गेट असणार आहेत. 28 कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतील. या एअरपोर्टवर कुणी हरवलं तर सापडणं मुश्कील आहे. हे जगातील सर्वात मोठे नाही तर महागडे विमानतळ असेल.
दुबई हे लक्झरीयस लाईफ स्टाईलसाठी ओळखले जाते. जगातील सर्वात महागडय़ा वस्तू दुबईत पाहायला मिळतात. पर्यटन म्हणूनही ते उदयास आले आहे. अशातच जगातील सर्वात महागडे आणि सर्वात मोठे विमानतळदेखील दुबईत तयार होतंय. सौदी अरेबियातील दमाम येथे असून अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ असे त्याचे नाव आहे. अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाच समांतर धावपट्टी आहेत. येथे पाच विमाने एकाच वेळी टेक ऑफ तसेच लँड करू शकतात. या विमानतळाच्या बांधकामासाठी 35 अब्ज डॉलर्स खर्च आला आहे. यूएईचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी दुबईच्या गरजा लक्षात घेऊन त्याच्या बांधकामाचे आदेश दिले आहेत. विमानतळ उभारण्यासाठी दहा वर्षांचा मोठा कालावधी लागणार आहे.