बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी, तसेच एन्काऊंटर करणाऱया पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिकेतून केली आहे. दोन दिवसांपूर्वी अक्षय शिंदेच्या पित्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन मुलाची हत्या झाल्याचा दावा केला आहे.
मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणी न्यायालयाच्या नियंत्रणाखाली एसआयटी चौकशीचे निर्देश देण्याची विनंती जनहित याचिकेत केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसांपूर्वीच अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पोलिसांवर कडक ताशेरे ओढले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल झाल्याने पोलीस व राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे.
याचिकेतील मागण्या
> अक्षय शिंदेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.
> निष्पक्ष तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या
नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी.
> पोलीस अधिकारी कर्तव्य बजावतात त्यावेळी बॉडी पॅमेऱयाचा वापर करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश पेंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना द्यावेत.
> एसआयटीमध्ये विविध तपास
यंत्रणांच्या निवृत्त अधिकाऱयांचा समावेश करण्यात यावा.
> एसआयटी तपास करीत असताना
‘एन्काऊंटर किलिंग’मध्ये सहभागी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे.