मला काढून टाकलं… अक्षय कुमारने ‘भूल भुलैया’ 2 आणि 3 वर सोडलं मौन

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने अनेक कॉमेडी सिनेमांमध्येही काम केले. यापैकीच त्याचा 2007 चा हॉरर-कॉमेडी ‘भूल भुलैया’ सिनेमातील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यानंतर या सिनेमाचा दुसरा आणि तिसरा सिक्वेल आला. मात्र, अक्षय कुमार त्यात नव्हता. तो त्या सिनेमात का नव्हता? हा सर्वांनाच पडलेला प्रश्न होता. आता यावर अक्षय कुमारने मौन सोडले आहे.

अक्षय कुमारने नुकतेच पिंकविल्लासोबतच्या विशेष चॅटमध्ये एका चाहत्याने ‘भूल भुलैया’ 2 आणि 3 सिनेमात अक्षय कुमार नसल्याने तो सिनेमा पाहिला नाही, असे सांगितले. त्याच्यावर अक्षय कुमार म्हणाला, अरे बाळा मला काढून टाकण्यात आले होते, बस्स. ‘भूल भुलैया’ 2 आणि 3 मध्ये अक्षय कुमारची जागा कार्तिक आर्यनने घेतली होती. दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. ज्यांनी मोठ्या प्रमाणात कमाई केली होती.

पिंकविलासोबतच्या संवादादरम्यान, अक्षय कुमारने ‘हेरा फेरी 3’ चे अपडेट शेअर केले आणि शूट कधी सुरू होणार हे उघड केले. ‘हेरा फेरी 3’ सुरू होण्याची मी वाट पाहत आहे. माहित नाही, पण सर्वकाही ठीक झाले तर ते या वर्षी सुरू होईल, असे अक्षय कुमार म्हणाला. ‘जेव्हा आम्ही ‘हेरा फेरी’ सिनेमा केला, तेव्हा आम्हाला माहित नव्हते की पुढे जाऊन तो इतका लोकांना आवडेल. मी सिनेमा पाहिला तेव्हाही मला समजले नाही. होय, ते मजेदार होते. मात्र आमच्यापैकी कोणालाही बाबू भैया, राजू आणि श्याम या पात्रांची हिट होण्याची अपेक्षा होती. अक्षय कुमार पुढे म्हणाला. सध्या अक्षय कुमार ‘भूतबंगला’ या सिनेमाची शूटिंग करत आहे. या सिनेमात 14 वर्षांनंतर अक्षय आणि प्रियदर्शन पुन्हा एकत्र आले.