कुंभमेळ्याला येणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करा!

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात येणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. जर मनोरंजनासाठी चित्रपट टॅक्स फ्री करू शकत असाल तर कुंभमेळ्याला येणाऱ्यांसाठी टोलदेखील माफ केला पाहिजे. दररोज महाकुंभात स्नान करण्यासाठी दूरदूरून भाविक येत आहेत. मी हिमाचल प्रदेशसह इतर राज्यांतील अनेक प्रवाशांशी बोललो. त्यामुळे सरकारने महाकुंभाला येणाऱ्या भाविकांसाठी टोलमाफी करावी, असे अखिलेश यांनी आज सांगितले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर हल्ला चढवला.

महाकुं भपंचतारांकित संस्कृती नाही-धर्मेंद्र दास

महाकुंभही काही पंचतारांकित संस्कृती नाही, अशा शब्दांत महंत धर्मेंद्र दास यांनी टीका केली आहे. मंत्री, नेते, अॅक्टर, मॉडेल्स महाकुंभच्या ठिकाणी येत असून त्यांच्या प्रसिद्धीवर संपूर्ण झोत आहे. त्यामुळे या पवित्र पर्वाचे लक्ष भलतीकडेच केंद्रित आहे असे सांगत साधु, संतांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.