नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून सरकारने मृतांचे आकडे लपवले

नुकसानभरपाई द्यावी लागेल म्हणून सरकार महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांचा आकडा लपवत असल्याची टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. दुर्घटनेची सत्यता, आकडे लपवणे, पुरावे लपवणे हा एक गुन्हा आहे. लोकांचे लक्ष विचलित व्हावे या हेतूने हे सर्वकाही सुरू आहे. या घटनेमागे कोणतेही कटकारस्थान नसून हे केवळ सरकारचे अपयश आहे. साधू, संतदेखील हेच म्हणत आहेत, असा हल्ला अखिलेश यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून सरकारवर चढवला.