डबल इंजिन नाही हे तर डबल ब्लंडर सरकार, अखिलेश यादव यांची भाजपवर टीका

144 वर्षांतून पहिल्यांदा हा कुंभमेळा आला आहे असे खोटं पसरवलं गेलं अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली. तसेच हे डबल इंजिन सरकार नव्हे तर डबल ब्लंडर सरकार आहे असेही यादव म्हणाले.

यादव म्हणाले की 144 वर्षानंतर उत्तर प्रदेशमध्ये हा कुंभमेळा होणार आहे ही बाब वारंवार खोटी सांगितली गेली. दर 12 वर्षानंतर कुंभमेळा येतो. 100 कोटीं भाविकांसाठी कुंभमेळ्यात तयारी केली गेली असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. त्यामुळे लोकांचा विश्वास बसला. पण हे योगी खोटं बोलल्याने भाविकांच्या धार्मिक भावनांना ठेस पोहोचली. कुंभच्या पाण्यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय हरित लवादाचे मतभेद समोर आले. त्यामुळे हे डबल इंजिन सरकार नसून डबल ब्लंडर सरकार आहे अशी टीका अखिलेश यादव यांनी केली.