सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सगळेच पक्ष प्रचारात व्यस्थ आहे. अशातच
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘ज्यांनी एन्काउंटर केले त्यांची उलटी गिनती सुरू झाली आहे. आता ते जास्त काळ सरकारमध्ये राहणार नाहीत’ असे ते यावेळी म्हणाले.
लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला अखिलेश यादव यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. ‘सध्या संत समाजात भांडणे लावण्याचे काम सुरू आहे. जे स्वत:पेक्षा श्रेष्ठ कोणाला मानतच नाही, ते ‘योगी’ कसे?… संत जेवढे मोठे, तेवढे ते कमी बोलतात आणि ते बोलतो तरी लोककल्याणबाबत भाष्य करतात. त्यामुळे तर त्यांची लोक प्रवचने एकतात. पण येथे सगळ उलटच आहे. असे ते म्हणाले.
‘ज्या पद्धतीने हे भाषा वापरत आहेत, त्यावरून तुम्हाला आणि मलाही त्याची पात्रता कळायला हवी. माणूस कपड्याने नाही तर बोलण्याने योगी बनतो. जे संत, योग आपल्याला अमृतकाळाची आठवण करून देतात. हा अमृतकाळ स्वातंत्र्याचा नसून विनाशाचा आणि नकारात्मक लोकांचाही आहे. येथे असे मानले जाते की जो अधिक ज्ञानी आहे, तो अधिक शांत राहतो. म्हणूनच आपल्याकडे मौन आणि ऋषीमुनींची परंपरा आहे. मात्र कलयुगात याच्या उलट घडत आहे. परोपकारी लोग कठोर अत्याचाराची कामे करत आहेत. असा हल्लाबोल अखिलेश यादव यांनी यावेळी केला.
सीएम योगी यांचे नाव न घेता अखिलेश यादव यांनी तोशेरे ओढले. ‘ज्यांचे काम सरकार चालवणे आहे ते बुलडोझर चालवत आहेत. त्यामुळे विकासाचे प्रतीक विनाशाचे प्रतीक बनले आहे. सर्वोच्च न्यायासयाचा आदेश तुम्ही एकलाच असेल. सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझरच्या कारवाईविरोधात उत्तर प्रदेश सरकारला 25 लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. असे ते यावेळी म्हणाले.