
भाजपा वक्फ कायदा आणून जमिनी घशात घालण्याची तयारी करत आहे. जिथे जमीन दिसेल त्या जमिनीवर कब्जा करत आहे. हा पक्ष म्हणजे भूमाफिया आहे, असा आरोप समाजवादी पार्टीचे अध्यक्ष व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 2027 ची निवडणूक इंडिया आघाडीसोबत लढणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मागासवर्गीय, दलित आणि अल्पसंख्याक मिळून भाजपाची सत्ता मुळासकट उखडून फेकू आणि समाजवादीचे सरकार बनवून सर्वांना न्याय देऊ असे यादव म्हणाले.