![Marathi sahitya Sammelan](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-11-2-696x447.jpg)
98 वे मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन 21 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता विज्ञान भवन येथे होईल. सुरक्षेच्या कारणामुळे विज्ञान भवनामध्ये केवळ निमंत्रितांनाच उपस्थित राहता येईल. संमेलनाची कार्यक्रम पत्रिका आज साहित्य महामंडळाने जाहीर केली.
21 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रंथदिंडीची सुरुवात होईल. उद्घाटन समारंभाचे दुसरे सत्र सायंकाळी 6.30 वाजता तालकटोरा स्टेडियममध्ये होईल. या सत्रात विद्यमान अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे व नियोजित अध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर यांची अध्यक्षीय भाषणे होतील. उद्घाटन समारंभानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन मुख्य मंडपात होईल. 22 फेब्रुवारी- मुख्य मंडपात सकाळी 11 वाजता ‘मराठी पाऊल पडते पुढे’ परिसंवाद होणार आहे. दुपारी 12.30 वाजता ‘मराठीचा अमराठी संसार’ या विषयावर अन्य भाषक सहचारी/सहचारिणी असलेल्या व्यक्ती आपले सहजीवन उलगडून दाखवतील.
23 फेब्रुवारी – मुख्य सभागृहात ‘असे घडलो आम्ही’ परिसंवाद तर दुपारी 12 ते 2 ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य’ यावर चर्चासत्र होईल. दुसऱ्या मंडपात सकाळी 10 वाजता ‘अनुवाद-मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत’ यावर वत्ते आपली मते मांडतील. दुपारी 12 वाजता ‘पृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे. दुपारी 4.30 वाजता संमेलनाचा समारोप होईल.