![Marathi sahitya Sammelan](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-11-2-696x447.jpg)
नवी दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची विस्तृत कार्यक्रम पत्रिका गुरुवारी जाहीर झाली. परिसंवाद, कविकट्टा, मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रम असे संमेलनाचे स्वरूप आहे. यासोबतच राजकीय नेत्यांची मोठी जंत्री संमेलनाच्या व्यासपीठावर दिसणार आहे.
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये साहित्य महामंडळ आणि सरहद या निमंत्रक संस्थेकडून यंदा 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन होत आहे. दोन दिवसांपूर्वी साहित्य महामंडळाने दिल्ली साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली. मात्र त्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त झाले. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा संमेलनाची विस्तृत कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली. संमेलनात मराठी व्यावसायिकांची मुलाखत, अधिकारी, लेखकांचा विशेष सत्कार, भूपाळी ते भैरवी हा लोकसाहित्याचा सांस्कृतिक कार्यक्रम, मधुरव, आनंदी गोपाळ अशा वेगळ्या कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. निमंत्रितांचे कविसंमेलन, बहुभाषिक कविसंमेलन, मराठी माणसाचे जीवन व साहित्य, मराठी भाषा व महाराष्ट्र धर्म असे कार्यक्रम होतील.
23 फेब्रुवारी
n सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य, अध्यक्ष अशोक वानखेडे, सहभाग प्रतिभा बिस्वास, डॉ. कोमल ठाकरे, मोहीब कादरी, विश्वास लीलावती जयदेव ठाकूर
n अनुवाद मराठीतून इतर भाषेत पिंवा इतर भाषेतून मराठीत- अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार, सहभाग डॉ. पृथ्वीराज तौर, सुनीता डागा, दीपक बोरगावे, विजय नाईक
n कृत्रिम बुद्धिमत्ता व सर्जनशीलता- अध्यक्ष सौरभ करंदीकर, सहभाग – बालाजी सुतार, सम्राट फडणीस, श्रीमंत माने, डॉ. राजेश खरात, डॉ अनिल मडके.