सासऱ्याचे पुन्हा ऐकणार नाही, क्षमा करा; आकाश आनंद यांनी मागितली मायावतींची माफी

बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेले बसपा सुप्रीमो मायावती यांचे पुतणे आकाश आनंद यांनी माफी मागितली असून पुन्हा पक्षाचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता नातेवाईकांचे किंवा सासऱयाचे कुठल्याही परिस्थितीत ऐकणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

‘एक्स’वरून त्यांनी मायावती यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. एकमेव मायावती यांना राजकारणातील गुरू आणि आदर्श मानतो असेही त्यांनी म्हटले आहे. बहुजन समाजवादी पार्टीच्या हितासाठी मी नातेवाईक आणि खासकरून सासरकडच्या लोकांना कुठल्याही परिस्थितीत अडथळा बनू देणार नाही अशी शपथ घेतो, असे आकाश आनंद यांनी म्हटले आहे.