एमसीए-डॉ. एच. डी. कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत ‘ए’ डिव्हिजनमध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आणि पारसी जिमखाना यांच्यातील लढत अनिर्णित राहिली तरी सीसीआयच्या आकाश आनंदने (106ङ ) नाबाद शतक ठोकताना छाप पाडली. त्याच्या तडाखेबंद शतकामुळे सीसीआयने पहिल्या डावात 43 षटकांत 3 बाद 303 अशी मोठी धावसंख्या उभारली.
आकाशच्या 116 चेंडूंतील खेळीत 13 चौकारांचा समावेश आहे. त्याला अखिल हेरवाडकरची (74 धावा, 82 चेंडू, 12 चौकार) चांगली साथ लाभली. याच डिव्हिजनमधील अन्य लढतीत शिवाजी पार्क जिमखाना संघाने परेल स्पार्टिंग क्लबवर पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय मिळवला. त्यात सत्यम चौधरीची (6/38) प्रभावी गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरली.