अजित पवारांची जप्त मालमत्ता मुक्त

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी गुरुवारी शपथ घेतल्यानंतर त्यांना दुसऱ्याच दिवशी दिल्लीतील ट्रिब्युनल कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांची जप्त केलेली मालमत्ता जप्तीमुक्त करण्याचे आदेश कोर्टाने आयकर विभागाला दिले आहेत.

आयकर विभागाने अजित पवार यांची ही मालमत्ता 2023 मध्ये जप्त केली होती. यामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित मालमत्ताही होती. अजित पवारांच्या स्पार्कलिंग सॉईल, गुरू कमोडिटी, फायर पॉवर अॅग्रो फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आली होती. ही मालमत्ता जप्तीमुक्त करण्याचे आदेश ट्रिब्युनल कोर्टाने आज दिले आहेत.