कायदा हातात घ्याल तर कारवाई करू, अजित पवारांचा जरांगेंना इशारा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र काहीजण टोकाची भूमिका घेऊन मुंबईत येण्याची भाषा करीत आहेत. पण आरक्षणासाठी कायदा हातात घ्याल तर मुलाहिजा केला जाणार नाही, असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे-पाटील यांना दिला. त्यामुळे सरकार चर्चेतून मार्ग काढण्याऐवजी कारवाईच्या धमक्या देत असल्याने मराठा बांधव आणि सरकारमध्ये वादाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाचा मेळावा आज कल्याणच्या वरप गावात झाला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, सध्या 62 टक्के आरक्षण आहे. या व्यतिरिक्त मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, असे सांगून एक प्रकारे त्यांनी ओबीसी वर्गातून मराठयांना आरक्षण देण्यास विरोध असल्याचेच दाखवून दिले. संविधानाच्या चौकटीत मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण काही जण टोकाची भूमिका घेऊन मुंबईत येण्याच्या भाषा करतात. कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही, असा इशारा अजित पवारांनी जरांगे-पाटील
यांना दिला.

शरद पवारांवर टीका; आव्हाडांचे प्रत्युत्तर
शरद पवार यांनाही अजित पवार यांनी यावेळी पुन्हा वयाच्या मुद्यावरून लक्ष्य केले. सरकारी कर्मचारी वय पूर्ण होताच सेवानिवृत्त होतात असे अजित पवार म्हणाले. त्याला जितेंद्र आक्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. ‘बापाला कधी निकृत्त करायचं नसतं. बाप हेच घरातील उर्जास्त्राsत असतं. आई-बापाकिना घर रिकामं काटायला लागतं‘ असे ते म्हणाले.