अजित पवारांच्या घरी लवकरच सनई चौघडे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या घरी लवकरच मुलाच्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार आहेत. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचे लग्न निश्चित झाले आहे. येत्या 10 एप्रिलला जय आणि ऋतुजा यांचा साखरपुडा आहे. दरम्यान जय आणि ऋतुजा यांनी पवार कुटुंबातील ज्येष्ठ शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेतली आहे.

खासदार आणि जयची आत्या सुप्रिया सुळे यांनीही जय आणि ऋतुजा यांचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुजा या फलटण येथील प्रवीण पाटील यांच्या कन्या आहेत. प्रवीण पाटील हे सोशल मीडिया कंपनी सांभाळतात. ऋतुजा या उच्च शिक्षित असून, जय आणि दोघांमध्ये मागील काही वर्षांपासून ओळख आहे.