
लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढणार आहोत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पिंपरीतील मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत भोसरीतील कार्यकर्त्यांना स्पष्ट भूमिका घ्यावी लागेल. दिवसा एकीकडे आणि रात्री दुसरीकडे असे करू नका.’