
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाने फडणवीसांना पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांच्या ‘पुन्हा’ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपकडे 132 आमदार आहेत. तरीही मिंध्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी त्यांच्या मुख्यमंत्री होण्यात अडथळा येत होता. आता 41 आमदारांच्या अजित पवार गटाचे पाठिंब्याचे पत्र मिळाल्याने फडणवीसांच्या पाठीशी बहुमतापेक्षा जास्त आमदार आले आहेत. त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्रीपदाचे ते ठाम दावेदार ठरले आहेत. अजित पवारांच्या या पत्रामुळे एकनाथ शिंदे मात्र प्रचंड नाराज झाले आहेत. कारण त्यांनीही अजितदादांकडे पाठिंबा मागितला होता, परंतु त्यांनी फडणवीसांच्याच बाजूने काwल दिला.
मोदींना लाडक्या उद्योगपतींच्या फाईलवर डोळे झाकून सही करणार हमुख्यमंत्री हवाय – पटोले
मोठे बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्री ठरवण्यात विलंब का होत आहे, असा सवाल करत महायुतीवर टीकांचा भडिमार होत आहे. महायुतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, त्यांना फक्त महाराष्ट्र विकणारा व्यक्ती हवा आहे, नरेंद्र मोदी यांना लाडक्या उद्योगपती मित्राच्या फाईलवर डोळे झाकून सही करणारा व्यक्तीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी हवा आहे, असे टीकास्त्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोडले.
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो – सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाही यात काही आश्चर्य वाटत नाही. राज्यात एवढं मोठ बहुमत असताना एवढा का वेळ लागतोय हे आश्चर्यकारक आहे. आम्ही त्यांच्याजागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो, राज्यात एवढे प्रश्न असताना हे शपथ का घेत नाहीत माहीत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या-खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप महायुतीला लगावला आहे.