अटकेपासून वाचण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच भाजपने ज्या ज्या नेत्यांवर आरोप केले ते नेते भाजपसोबत गेले असेही जयंत पाटील म्हणाले.
एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी अजित पवार भाजपसोबत गेले. भाजपने अनेक नेत्यांवर आरोप केले ते भाजपसोबत गेले. हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपने आरोप केले होते आता ते महायुतीमध्ये मंत्री आहेत. नवाब मलिक यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते पण ते आता अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. भाजपचे जे मतदार आहेत ते सुद्धा गोंधळलेले आहेत. भाजपने स्वतःला वेगळा पक्ष म्हटलं होतं, पार्टी विथ डिफरन्स म्हटले होते पण आता त्यांचा पाठीराखा वर्गही संभ्रमात आहे असे जयंत पाटील म्हणाले.