ओबीसीसह सर्व घटकांना आरक्षण देऊन निवडणुका

आगामी महापालिका निवडणुकीसाठी चांगले वकील देऊन ओबीसीसह सर्व घटकांना आरक्षण देऊन निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करत आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर असल्याच्या चर्चा खोटय़ा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.