नाशिकचं हवा-पाणी बाधलं? अजितदादांच्या घशाला संसर्ग; सर्व कार्यक्रम रद्द

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत बिघडल्याने त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. अजित पवार हे रविवारी नाशिक दौऱ्यावर होते. नाशिकच्या भगूर गावात पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन सोहळ्या त्यांच्या हस्ते पार पडला. मात्र नाशिकचे हवा-पाणी अजितदादांना चांगलेच बाधले असून त्यांच्या घशाला संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांचे आज होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

भगूर येथील जाहीर कार्यक्रमात आमदार सरोज अहिरे यांनी शिंदे गटावर आरोप केले होते. त्यानंतर अजित पवार यांचे भाषण झाले. या भाषणावेळीच त्यांनी आपली तब्येत बरी नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द केले आणि तातडीने पुण्याला आले होते. अद्याप त्यांच्या प्रकृतीत म्हणावी तशी सुधारणा न झाल्याने त्यांचे आजचे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले.

महायुतीतील नाराजीनाट्याचा पुढचा अंक; अजितदादांसमोर महिला आमदारानं वाचला तक्रारींचा पाढा, मिंधे गटावर आरोप