अजित पवार, भुजबळ फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप

अजित पवार आणि छगन भुजबळ हे दोघे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. दरम्यान, देशासाठी तळमळ असलेल्या लोकांना घेऊन सामान्य माणसांसाठी नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

लाडकी बहीण योजना महिलांना सक्षम बनवण्यासाठी वापरली असती तर बरे झाले असते, पण तसे न करता दीड हजारांची लाच दिली गेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला भिकारी बनवू नका, हे कराचे पैसे आहेत, असे सांगत त्यांनी मिंधे सरकारवर टीका केली. निवडणुकीत मोठय़ा पक्षाचा जनरल सेक्रटरी पैसे वाटताना पकडले गेले असे म्हणत दमानिया यांनी भाजपचे विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला.