2019 साली रोहित पवार हे कर्जत जामखेड मधून आमदार झाले, ते चांगलं काम करत आहेत अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की मला राजकारणात आवड होती म्हणून मी राजकारणात आलो. नंतर सुप्रिया सुळे यांनी राजकारणात येण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्याही राजकारणात आल्या. नंतर रोहित पवारांना राजकारणात यायचं होतं. तेव्हा आम्ही त्यांना पुण्यातून लढण्याऐवजी शेजारच्या नगर जिल्ह्यातून लढायला सांगितलं. नाही तर लोक बोलले असते की संपूर्ण पवार कुटुंब पुण्यातूनच निवडणूक लढवत आहेत. रोहित पवार यांनी नगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेडमधून निवडणूक लढवली आणि ते जिंकलेही. ते चांगलं काम करत आहेत असेही अजित पवार म्हणाले.