
उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर आहेत. बुधवारी सकाळी ते हेलिकॉप्टरने बीडमध्ये दाखल झाले. हेलिकॉप्टरमधून उतरताच अजित पवार चांगलेच संतापले आणि अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टी काढली.
हेलिपॅडवर जमलेली कार्यकर्त्याची गर्दी बघून अजित पवार पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्यावर संतापले. मी सगळीकडे एवढे फिरतो, पण अशी बेशिस्त कुठेच बघितली नाही, असे म्हणत अजितदादांनी कावत यांना खडसावले. यावेळी पोलीस अधीक्षकांनीही सर्व काही गुपचुप ऐकून घेतले.
विशेष म्हणजे यानंतर अजित पवारांनी पत्रकारावरही राग व्यक्त केला. ‘मी येथे काम करायला येतो, काम करू द्या’, असे म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांना अजित पवारांनी खडसावले.
मला अप टू डेट माहिती हवीय!
दरम्यान, अजितदादांनी पोलीस अधीक्षक, सीईओ आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही फैलावर घेतले. दुपारच्या मिटिंगवेळी हे माहिती नाही, ते माहिती नाही असे खपवून घेणार नाही. मला अप टू डेट माहिती हवीय, असे ते म्हणाले.
हे माहिती नाही, ते माहिती नाही खपवून घेणार नाही; मला अप टू डेट माहिती हवीय! बीडमध्ये अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर pic.twitter.com/yloW5R9n3q
— Saamana Online (@SaamanaOnline) April 2, 2025
धनंजय मुंडे आजारी
दरम्यान, अजित पवार बीडमध्ये दाखल झालेले असतानाच माजी मंत्री धनंजय मुंडे आजारी पडले आहेत. त्यामुळे अजितदादांच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यांनी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली आहे.
काय आहे ट्विट?
‘उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही. याबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, ही विनंती’, असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री माननीय @AjitPawarSpeaks साहेब यांच्या आजच्या बीड मधील नियोजित दौऱ्यात मी पूर्ण वेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) April 2, 2025