अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त पैशांच्या बळावर निवडून आले; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. मात्र या निकालांवर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यावेळी विजयी झालेल्या महायुती सरकारवर टीका करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

महाष्ट्रातील विधानसभा निवडणुकींच्या निकालावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर निशाणा साधला. अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवणूक जिंकली असल्याचे आरोप त्यांनी केले. लाडकी बहीण योजना बहिणींना सक्षम बनवण्यासाठी वापरली असती तर बरे झाले असते. ही लाच दिली गेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला भिकारी बनवू नका. जनतेच्या महेनतीचे आणि कराचे हे पैसे आहेत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, अंजनी दमानिया यांनी महाराष्ट्रात एक नवीन राजकीय पक्ष काढणार असल्याची मोठी घोषणा देखील केली. महाराष्ट्रच राजकारण एक गटार गंगा झाली आहे असा टोला त्यांनी लगावला. निवडणुकीत मोठ्या पक्षाचा जनरल सेक्रटरी पैसे पाठताना पकडले गेल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. हे चौथी पास असणारे नेते देशाला कोणती दिशा देणार. अशी टीका देखील अंजली दमानिया यांनी केली. त्यामुळे ज्या लोकांना देशासाठी तळमळ आहे, त्यांना घेऊन सामान्य माणसासाठी हा पक्ष काढणार,असेही दमानिया म्हणाल्या.