अजय बारस्करांचा फडणवीसांच्या ‘सागर’वर ठिय्या

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर आरोप करून वादात सापडलेले अजय बारस्कर यांनी आज थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर ठिय्या मारला होता.  देवेंद्र फडणवीस यांची भेट मिळू शकली नाही. मात्र परवानगी नसताना आंदोलन करण्याच्या प्रकरणी पोलिसांनी अजय बारस्करांना ताब्यात घेतले.

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले  मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर अजय बारस्कर यांनी टीका केली होती. त्यानंतर अजय बारस्कर यांची मोटार पंढरपूर येथील 65 एकर मैदानातील पार्किंगमध्ये जळलेल्या अवस्थेत आढळून आली होती. यासंदर्भात त्यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे.