बॉलीवूडची सर्वाधिक लोकप्रिय जोडी ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचे नाते बिघडल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगल्या आहेत. दोघांचा घटस्फोट झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सातत्याने येत असतात. अर्थात याबद्दल बच्चन परिवाराने कुठलेही भाष्य केलेले नाही. अशातच अफवांचे पेव उठवणाऱ्यांना नेटिजन्सला चपराक बसेल असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत ऐश्वर्या आणि अभिषेक पार्टीमध्ये एकत्र दिसत आहेत. ऐश्वर्या अभिषेकसोबत सेल्फी घेतानाही दिसत आहे. या फोटोमुळे त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
ऐश्वर्या-अभिषेक दोघेही गुरुवारी रात्री आयेशा जुल्का, अनू रंजन आणि इतर प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत पोज देताना दिसले. या वेळी ऐश्वर्याची आई वृंदाही सोबत होती. फिल्ममेकर अनू रंजनने फोटो शेअर केला आहे. या फोटोत ऐश्वर्या राय सेल्फी काढताना दिसत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्याची आईसुद्धा फोटोमध्ये आहे.