स्पॅम कॉल टाळण्यासाठी एअरटेलचे नवे फीचर

एअरटेलने स्पॅम कॉल्स आणि मेसेजपासून ग्राहकांची सुटका व्हावी यासाठी एक नवीन फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे आता ग्राहकांना स्थानिक भाषेत अलर्ट मिळेल. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरांवरून होणाऱ्या फसवणुकीचे मेसेज आणि कॉल्सचे अलर्ट मिळेल. एअरटेलने एक फोटो शेअर करून ही माहिती दिलीय. हिंदुस्थानातील ग्राहकांना मराठी, हिंदी, बांगला, गुजराती, तमीळ, कन्नड, मल्याळम, उर्दू, पंजाबी आणि तेलुगू या भाषेत अलर्ट मिळणार आहे. ही सर्व्हिस एकदम फ्री असून सर्व अँड्रॉईड युजर्सच्या फोनमध्ये ऑटो ऑक्टिवेट होईल, असे एअरटेलकडून सांगण्यात आले.