एअरबस कंपनी देशातील आठ शहरांत बनवणार हेलिकॉप्टर

एअरक्राफ्ट बनवणारी युरोपची कंपनी एअरबसने आपले एच 125 हेलिकॉप्टरच्या निर्माणासाठी हिंदुस्थानच्या आठ शहरांची निवड केली आहे. कंपनी या शहरात दुसरा प्लांट म्हणजेच चौथा असेंबली लाइन उघडण्याची योजना बनवत आहे. यासाठी एअरबसने हिंदुस्थानच्या टाटा अडवॉन्स्ड सिस्टम लिमिटेड (टीएएसएल) सोबत पार्टनरशिपसुद्धा केली आहे. येत्या काही दिवसांत कंपनीच्या पहिल्या असेंबलीचे उद्घाटन केले जाणार आहे. यानंतर या ठिकाणी सी 295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टचे निर्माण केले जाणार आहे. हिंदुस्थानातील आठ शहरांत हेलिकॉप्टर बनवले जाणार आहे, अशी माहिती दिली असली तरी ती कोणती शहरे आहेत, याची माहिती अद्याप कंपनीने गुलदस्त्यात ठेवली आहे. लवकरच या शहरांच्या नावाची घोषणा केली जाईल, असे एअरबस कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष ओलिव्हर मिचालोन यांनी सांगितले. हा एअरबस कंपनीचा चौथा प्लांट असेल. या ठिकाणी सिंगल इंजिन हेलिकॉप्टर बनवले जाईल. याआधी कंपनीचे प्लांट अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील या देशांत आहेत. हिंदुस्थानात सिंगल इंजिन 125 ची फायनल असेंबली लाइन (एफएएल) खासगी सेक्टरमध्ये हेलिकॉप्टर बनवणारी पहिली कंपनी आहे.

20 वर्षांत 500 हेलिकॉप्टर तयार करणार

हिंदुस्थानात हेलिकॉप्टरची मोठी मागणी आहे. यासाठी कंपनी दरवर्षी या प्लांटमध्ये 10 हेलिकॉप्टरचे उत्पादन करणार आहे. 2026 पासून हेलिकॉप्टरचे काम सुरू केले जाईल. हिंदुस्थानात बनवले जाणारे हेलिकॉप्टर केवळ कमी वेळेत बनवले जाणार नाही, तर शेजारी राष्ट्रांमधील मागणीलासुद्धा पूर्ण केले जाईल. एच 125 हेलिकॉप्टर हिंदुस्थानात ए 320 एअरबस समान यशस्वी होतील. हिंदुस्थानातील गुजरातच्या वडोदरामधील एअरबसची पहिली असेंबली साइन जवळपास तयार झाली आहे. यात एअरफोर्ससाठी सी 295 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टचे निर्माण केले जाईल.