मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावण्यास सुरुवात झाली असून ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ने सरासरी शंभरचा आकडा पार केला आहे. तर काही ठिकाणी ‘एक्यूआय’ दोनशे पार झाला आहे. त्यामुळे पालिकाही सतर्क झाली असून रस्ते, बांधकामांसह सर्व प्रकारच्या कामांच्या ठिकाणी कंत्राटदारांना पर्यावरण मॅनेजमेंट प्लॅनचे 27 नियम पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत संबंधितांकडून नियम पाळत असल्याबाबत पालिकेला लिखित हमी द्यावी लागणार आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळय़ात हवेची गुणवत्ता खालावत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे धुरक्यामुळे कमी होणारी दृश्यमान्यता आणि प्रदूषणामुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षी प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठत ‘एक्यूआय’ अडीचशेच्या पार गेला होता. त्यामुळे पालिकेची चिंता वाढली होती. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने गेल्या वर्षी 23 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली. ही नियमावली मुंबईत सुरू असलेल्या पाच हजारांवर बांधकामांना पाळणे बंधनकारक करण्यात आले. यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये सब इंजिनीयरचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत सद्यस्थितीत सरासरी ‘एक्यूआय’ 130 पर्यंत आला आहे. त्यामुळे पालिकाही सजग झाली आहे.
14 नोव्हेंबरचा ‘एक्यूआय’
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स 142
सिद्धार्थ नगर, वरळी 228
माझगाव 145
मालाड पश्चिम 142
नेव्ही नगर, कुलाबा 168
कांदिवली पश्चिम 166
घाटकोपर 186
बोरिवली पूर्व 154
अशी ठरते हवेची गुणवत्ता
z हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते.
z 51 ते 100 ‘समाधानकारक’,
z 101 ते 200 ‘मध्यम’
z 201 ते 300 पर्यंत ‘खराब’
z 301 ते 400 ‘अतिशय खराब’