मुंबईच्या प्रदूषणामध्ये वाढ होत असून गेल्या कुलाब्यासह भायखळय़ामध्येही आता ‘अतिशय खराब’ हवा नोंदवली गेली आहे. शिवाय वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगरमध्येही हवेची गुणवत्ता खालावली असल्याने मुंबईच्या चिंतेत वाढ होत आहे. त्यामुळे पालिका आता वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत थंडी वाढत असतानाच हवेचे प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली असून घशाच्या आजारांना निमंत्रण मिळत आहे. नेव्हीनगर कुलाब्यात आज हवेच्या गुणवत्तेचा एक्यूआय तब्बल 314 आणि भायखळ्यामध्ये तब्बल 306 इतका नोंदवला गेला. म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ही हवा ‘अतिशय खराब’ म्हणून नोंदवली गेली आहे. शिवाय वरळी, माझगाव, शिवडी आणि शिवाजीनगर या ठिकाणीदेखील एक्यूआय 200 ते 300 दरम्यान, म्हणजेच ‘खराब’ हवा असा नोंदवला गेला आहे. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ ‘एक्यूआय’ तपासला जातो.
706 बांधकामांची झाडाझडती
गेल्या वर्षी प्रदूषणाने अत्युच्च पातळी गाठल्याने ‘एक्यूआय’ अडीचशेच्या पार गेला होता. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने गेल्या वर्षी 27 प्रकारची नियमावली जाहीर केली. यामध्ये या वर्षी दोन नियम वाढवण्यात आले आहेत.
यामध्ये शेकोटी पेटवण्यास बंदी आणि बांधकामाच्या ठिकाणी जेवळ बनवण्यासाठी चूल तयार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पालिकेने 706 ठिकाणी भेटी देऊन 24 जणांना नोटीसही बजावण्यात आली आहे.
आज असा नोंदवला एक्यूआय
नेव्ही नगर, कुलाबा
एक्यूआय 317 – दर्जा ‘अतिशय खराब’
भायखळा
एक्यूआय 306 – दर्जा ‘अतिशय खराब’
सिद्धार्थ नगर, वरळी
एक्यूआय 272 – दर्जा ‘खराब हवा’
माझगाव
एक्यूआय 246 – दर्जा ‘खराब हवा’
शिवाजीनगर गोवंडी
एक्यूआय 238 – दर्जा ‘खराब हवा’