एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती, 30 सप्टेंबरपासून कार्यभार सांभाळणार

एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरपासून अमर प्रीत सिंग पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. सध्याचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. यानंतर अमर प्रीत सिंग पदाचा कार्यभार स्वीकारतील. अमर प्रीत सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत.

अमर प्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला होता. त्यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी हिंदुस्थानी हवाई दलाचे 47 वे उपप्रमुख पद स्वीकारले होते.

हवाई दलाचे पहिले प्रमुख कोण?

देशाच्या स्वातंत्र्यानंतर एअर मार्शल अर्जन सिंग हे स्वतंत्र हिंदुस्थानचे पहिले एअर चीफ मार्शल बनले. 01 ऑगस्ट 1947 ते 21 फेब्रुवारी 1950 पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. यानंतर ते हवाई दलाचे पहिले मार्शल बनले. 1 एप्रिल 1954 रोजी पहिले हिंदुस्थानी एअर मार्शल सुब्रत मुखर्जी यांनी हवाई दलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.