Video – पाहा बेरोजगारीचे भीषण वास्तव, एअर इंडिच्या 600 जागांसाठी जमा झाले 25 हजार उमेदवार

एअर इंडियाच्या 600 जागांसाठी मंगळवारी भरती आयोजित करण्यात आली आहे. मात्र अवघ्या 600 जागांसाठी तब्बल 25 हजाराहून अधिक तरुण एअर इंडियाच्या कार्यालयात पोहोचले होते. कार्यालयाबाहेर तोबा गर्दीचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यावरून देशातील बेरोजगारीची भीषण वास्तव समोर आले आहे. या व्हिडीओत फॉर्म घेण्यासाठी देखील तरुणांमध्ये वाद व धक्काबुक्की होताना दिसत आहे. त्यात काही तरुणांची तब्येत देखील बिघडल्याचे समजते.

एअर इंडियाची उपकंपनी असलेल्या ‘ए आय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड’ मध्ये 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. 16 जुलैला अखेरच्या दिवशी हँडीमन च्या 600 पदांसाठी 20 ते 30 हजार उमेदवारांची तुडुंब गर्दी झाली होती. अशा प्रचंड गर्दीमुळे एअर इंडियाच्या व्यवस्थापनावर केवळ फॉर्म जमा करून घेण्याची नामुष्की ओढवली. व्यवस्थापनाच्या चुकीच्या नियोजनमुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातून आलेल्या गरीब बेरोजगार तरुणांना केवळ फॉर्म जमा करण्यासाठी मानसिक त्रास व हजारो रुपये भूर्दंड सहन करावा लागला.