एअर इंडियाची नमस्ते वर्ल्ड सेल योजना; केवळ 1499 रुपयांत विमान प्रवास

टाटा समूहाच्या एअर इंडियाने स्वस्तात प्रवास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. एअरलाइनने आज ‘नमस्ते वर्ल्ड सेल’ची घोषणा केली. याअंतर्गत प्रवाशांना स्वस्त दरात मस्त अशा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर उड्डाणाची संधी दिली जात आहे. देशांतर्गत मार्गांवर इकॉनॉमी क्लासमध्ये 1,499 रुपयांमध्ये प्रवास करता येईल, तर प्रीमियम इकॉनॉमी क्लासमध्ये 3,749 रुपयांपासून प्रवास सुरू करता येईल. 9,999 रुपयांमध्ये बिझनेस क्लासने प्रवास करू शकता. आंतरराष्ट्रीय मार्गांवर रिटर्न तिकीट 12,577 रुपयांमध्ये प्रवास करता येईल.

वेबसाइट आणि मोबाईल अॅपद्वारे बुकिंग करणाऱ्यांना कोणतेही सुविधा शुल्क भरावे लागणार नाही. आंतरराष्ट्रीय बुकिंगवर 999 रुपये आणि देशांतर्गत बुकिंगवर 399 रुपयांची अतिरिक्त बचत होतील. याशिवाय, एअरलाइनने ग्राहकांना अधिक सवलत देण्यासाठी अनेक बँकांशी हातमिळवणी केली आहे.