लक्षवेधक वृत्त – मस्कट-दिल्ली एअर इंडिया सेवा बंद

एअर इंडिया विमान कंपनीने ओमानच्या मस्कटला जाणारी विमान सेवा बंद केली. या मार्गावरील अखेरचे उड्डाण दिल्लीतून झाले. याआधी एअर इंडियाने मस्कट ते हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, मुंबई आणि दिल्लीसह अनेक शहरात ही सेवा सुरू होती. एअर इंडियाने सर्वात आधी मस्कट-हैदराबाद सेवा बंद केली. त्यानंतर चेन्नई आणि बंगळुरूची सेवा बंद केली. मंगळवारी अखेर दिल्ली ते मस्कटची सेवाही बंद केली.

रावळकोट तुरुंगातून 19 पैदी पळाले

पाकव्याप्त कश्मीरमधील रावळकोट तुरुंगातून 19 पैदी पळाले आहेत. त्यापैकी 6 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास एका कैद्याने सुरक्षा रक्षकाला त्याची लस्सी बॅरेकमध्ये आणण्यास सांगितले. सुरक्षा रक्षक येताच पैद्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याकडून चाव्या हिसकावून घेतल्या आणि पळ काढला.

टाटांकडून कर्मचारी कपात मागे

एकीकडे अनेक नामांकित पंपन्या कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबत आहेत, तर दुसरीकडे टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा यांचा मनाचा मोठेपणा समोर आला आहे. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सने (टीस) 115 कर्मचाऱयांना कामावरून कमी केले होते, पण रतन टाटा यांनी या कर्मचाऱयांची नोकरी वाचवली आहे. टीसने 28 जूनला या कर्मचाऱयांना टर्मिनेशन लेटर दिले होते.

इम्रान खान यांची अटक बेकायदा

संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवी हक्क कार्यगटाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची अटक बेकायदा असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांना मनमानीपणे जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना तातडीने सोडण्यात यावे तसेच झालेल्या त्रासाबद्दल नुकसानभरपाई देण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे.

पाकिस्तानात पेट्रोल 265 रुपये

पाकिस्तानात पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. शाहबाझ शरीफ सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. ही वाढ 1 जुलैपासून लागू झाली आहे. पेट्रोलचे दर 7.45 रुपयांनी तर डिझेल 9.60 रुपयांनी महागले आहे. पेट्रोल 258.16 रुपयांवरून 265.61 तर डिझेल 267.89 वरून 277.49 वर पोहोचले आहे.