स्वस्त आणि मस्त विमान प्रवासासाठा एअर इंडिया एक्सप्रेसने ‘फ्लॅश सेल’ची घोषणा केली आहे. यात तुम्ही 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीत (रुपये 1498 पासून) विमान प्रवास करू शकता. हा फ्लॅश सेल 13 जानेवारी 2025 पर्यंत केलेल्या देशांतर्गत फ्लाइट बुकिंगसाठी आहे, ज्यामध्ये 24 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत प्रवासाच्या तारखा लागू आहेत. एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरून फ्लाइटचे बुकिंग करून आकर्षक सवलत मिळवता येतील. फ्लॅश सेलव्यतिरिक्त, एअर इंडिया एक्सप्रेसने एक्सक्लुझिव्ह एक्सप्रेस लाईट भाडे 1328 रुपयांपासून सुरू होणारी ऑफरदेखील आणली आहे. एअरलाइन आपल्या वेबसाइट airindiaexpress.com वर लॉग इन करणाऱया सदस्यांसाठी ‘सुविधा शुल्क’ माफ करत आहे.